पुण्याच्या लेखकाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमात सहभाग...

ई एस एन पब्लिकेशन्स, इंडिया यांनी "MOST AUTHORS SIGNING THEIR OWN BOOK SIMULTANEOUSLY" ही संकल्पना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविण्यासाठी आयोजित केली होती.

डॉ. तुषार निकाळजे


यावेळी भारतातील वेगवेगळ्या राज्यांचे व शहरांमधील लेखक, संशोधक, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये पुण्याच्या लेखक व संशोधक असलेल्या डॉ. तुषार निकाळजे यांनी सहभाग घेतला होता.

या कार्यक्रमाकरिता आयोजकांनी काही संस्था व व्यक्तींना स्पॉन्सर शीपकरीता आवाहान केले होते. वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या प्रकारे या कार्यक्रमास हातभार लावला.

या कार्यक्रमात पुण्याच्या डॉ. निकाळजे यांनी चेन्नई (तामिळनाडू) येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या १४ विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी (स्पॉन्सर) खर्च केला आहे. चेन्नई (तामिळनाडू) येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व या जागतिक कार्यक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या १४ विद्यार्थ्यांना डॉ. निकाळजे यांनी स्वखर्चाने सहभागी करून घेतले होते.

या १४ विद्यार्थ्यांना देखील ई एस एन पब्लिकेशन्स, इंडिया यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सहभागी होण्याचे प्रमाणपत्र प्रदान केले आहे. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक, संशोधनात्मक प्रगतीसाठी या प्रमाणपत्राचा भविष्यात उपयोग होणार आहे. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

 "समाजाचा भाग असणाऱ्या प्रत्येकाने एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करणे, यामुळे व्यक्ती, कुटुंब, संस्था, समाज, देश यांची प्रगती होते", असे डॉ. निकाळजे यांनी यावेळी म्हटले.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म