सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये डॉ. निकाळजे यांच्या पुस्तकाचा समावेश

सोलापूर ( DailyMarathiNews) - डॉ. तुषार निकाळजे( Dr.Tushar Nikalje ) यांनी लिहिलेल्या "भारतीय निवडणूक प्रणाली- स्थित्यंतरे व आव्हाने" या पुस्तकाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये संदर्भ पुस्तक म्हणून समावेश करण्यात आला आहे.

सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये डॉ. निकाळजे यांच्या पुस्तकाचा समावेश...
सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये डॉ. निकाळजे यांच्या पुस्तकाचा समावेश...


नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला. त्यामध्ये डॉ. निकाळजे यांचे "भारतीय निवडणूक प्रणाली" या पुस्तकाचा संदर्भ पुस्तक म्हणून अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

यापूर्वी डॉ. निकाळजे यांचे हे पुस्तक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड, कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगाव, मुंबई विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ- नागपूर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ - पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - पुणे या विद्यापीठांच्या व अबेदा इनामदार महिला महाविद्यालय (स्वायत्त) पुणे, कीर्ती कॉलेज (स्वायत्त), मुंबई, तुळजाराम चतुरचंद कॉलेज (स्वायत्त) बारामती, पुणे या स्वायत्त महाविद्यालयांच्या बी. ए.व एम. ए.राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये संदर्भ पुस्तक म्हणून समावेश करण्यात आला आहे. 

डॉ. तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेवानिवृत्त शिक्षकेतर- कर्मचारी आहेत. ते वर्ष २०२२ मध्ये शिक्षकेतर- कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. या पुस्तकाच्या संदर्भान्वये डॉ. निकाळजे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये "कॉम्पेटेटिव स्किल्स ऑफ अ नॉन टीचिंग स्टाफ" ( competitive skills of a non - teaching staff) अशी नोंद झाली आहे.

या पुस्तकाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने वर्ष 2019 मध्ये लोकशाही, सुशासन व निवडणूक या विषयातील निष्णात व्यक्ती म्हणून डॉ. निकाळजे यांची निवड केली होती.

डॉ. तुषार निकाळजे
डॉ. तुषार निकाळजे



थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म