पुण्यातील लेखक डॉ. तुषार निकाळजे यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान...

DailyMarathiNews - Pune: जुलै- २०२६  मध्ये भारतीय साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या "MOST AUTHORS SIGHNING THEIR OWN BOOK " या ऐतिहासिक उपक्रमात ESN Publications India ने Guinness World Records मध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

चेन्नई येथे  आयोजित करण्यात आलेल्या भव्य साहित्यिक सोहळ्यात १,५७२  लेखकांनी एकाच वेळी स्वतःच्या पुस्तकांवर स्वाक्षरी करून हा विक्रम आपल्या नावावर नोंदविला.

या कार्यक्रमात देशभरातील विविध भाषा, विषय आणि क्षेत्रांतील १,५७२  प्रकाशित पुस्तकांच्या  लेखकांनी सहभाग घेतला. Guinness World Records  च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत एकाच वेळी स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे भारतीय साहित्यविश्वाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. 

"लेखनाची ताकद, साहित्यावरील प्रेम आणि भारतीय लेखकांची एकजूट यांचा हा जागतिक गौरव आहे. हा विक्रम भविष्यातील पिढ्यांना लेखनासाठी प्रेरणा देईल," असे आयोजकांनी सांगितले. 

या जागतिक उपक्रमामध्ये पुण्यातील लेखक डॉ. तुषार निकाळजे (Dr. Tushar Nikalje) यांचा सहभाग आहे. डॉ. निकाळजे यांना नुकतेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

डॉ. तुषार निकाळजे यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान


डॉ. निकाळजे यांनी लिहिलेल्या  "भारतीय निवडणूक प्रणाली-  स्थित्यंतरे व आव्हाने" या संशोधन पर मराठी पुस्तकाचा समावेश आहे.

डॉ. निकाळजे यांचे हे पुस्तक महाराष्ट्रातील ०९ विद्यापीठे व ०४ स्वायत्त महाविद्यालये  यांच्या १४ वेगवेगळ्या विषयांच्या बी.ए व एम. ए. (राज्यशास्त्र,  लोकप्रशासन,  पत्रकारिता) अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता प्राप्त आहे. 

डॉ. निकाळजे यांनी  मराठी भाषा व भारतीय निवडणूक प्रणाली या विषयास एक प्रकारे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवून दिले आहे.


भारतीय निवडणूक प्रणाली-  स्थित्यंतरे व आव्हाने (डॉ. निकाळजे यांनी लिहिलेले पुस्तक)





थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म