मालदीवच्या नेत्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भारतातील नावाजलेले व्यापारी अन् उद्योगपतीही चांगलेच संतापले आहेत. अनेक बडे उद्योगपती आणि सीईओ सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे लक्षद्वीपदेखील ट्रेंडिंगमध्ये आहे.
![]() |
पंतप्रधान नरेंद्र मोदी - संग्रहित छायाचित्र |
Business Leaders on India-Maldives Controversy: मालदीवचा मुद्दा सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. मालदीव सरकारने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबद्दल अपमानजनक पोस्ट केल्याबद्दल आपल्या तीन मंत्र्यांना निलंबित केले. मालदीवच्या नेत्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भारतातील नावाजलेले व्यापारी अन् उद्योगपतीही चांगलेच संतापले आहेत. अनेक बडे उद्योगपती आणि सीईओ सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे लक्षद्वीपदेखील ट्रेंडिंगमध्ये आहे.
एडलवाईस एमएफच्या राधिका गुप्ता यांनी मालदीवला फटकारलं
एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या एमडी आणि सीईओ यांनी लिहिले, "मी भारतीय पर्यटनाच्या क्षमतेने प्रभावित झाले आहे आणि नेहमी विचार करते की लक्षद्वीप आणि अंदमान असताना मालदीवला जाण्यासाठी इतके पैसे का द्यावे लागतील.” उत्तर आहे 1) पायाभूत सुविधा आणि 2) मार्केटिंग… पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यामुळे या ठिकाणाचे आकर्षण निर्माण झाले आहे. आमच्या हॉटेल ब्रँड्सनी आम्हाला वेळोवेळी दाखवून दिले आहे की, आम्हाला लक्झरी इतर कोणीही माहीत नाही. जागतिक दर्जाचा पर्यटन अनुभव तयार करण्यासाठी भारतीय आदरातिथ्याचा सर्वोत्तम फायदा घेऊ यात."
I am obsessed with the potential of a Indian tourism and have always wondered why we have to pay so much to go Maldives when we have Lakshadweep and Andaman.
— Radhika Gupta (@iRadhikaGupta) January 7, 2024
The answer is 1) infrastructure and 2) marketing. The PM’s recent visit has put the spotlight on these destinations.…
संताप व्यक्त करत निशांत पिट्टी यांनी बुकिंग केली रद्द
इझ माय ट्रिपचे सीईओ निशांत पिट्टी यांनी पोस्टमध्ये लिहिले, "आमच्या देशाशी एकजुटीने, @EaseMyTrip ने मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केले आहे".
Tweet ( post ) by - Nishant PittiIn solidarity with our nation, @EaseMyTrip has suspended all Maldives flight bookings ✈️ #TravelUpdate #SupportingNation #LakshadweepTourism #ExploreIndianlslands #Lakshadweep#ExploreIndianIslands @kishanreddybjp @JM_Scindia @PMOIndia @tourismgoi @narendramodi @incredibleindia https://t.co/wIyWGzyAZY
— Nishant Pitti (@nishantpitti) January 7, 2024
- Daily Marathi News