"मी जे बोलतो ते वस्तुस्थितीला आधारित असते. मी काही लेचापेचा नाही. परखडपणे बोलण्याची धमक माझ्यात आहे. खरेच सांगतो वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे."
![]() |
अजित पवार |
राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'हाय प्रोफाईल ड्रामा' सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ताब्यात घेण्याच्या लढाईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे काका शरद पवार यांच्यात टीका टिप्पणी सुरु आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार आरोप करत आपला गट खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिल्याची चर्चा सुरु आहे.
मी जे बोलतो ते वस्तुस्थितीला आधारित असते. मी काही लेचापेचा नाही. परखडपणे बोलण्याची धमक माझ्यात आहे. खरेच सांगतो वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे. नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हवी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांना पुन्हा एकदा नाव न घेता लगावला. हे काही राजकीय व्यासपीठ नाही. माझी भूमिका मी लवकरच राजकीय व्यासपीठावर मांडणार आहे, असे सांगून अजित पवार यांनी पक्षीय विरोधकांबाबतचा सस्पेन्स आणखीनच वाढवला आहे. नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे ''सुविचार मंच''तर्फे सुविचार गौरव पुरस्कार वितरण पार पडला त्यावेळी अजित पवार बोलत होते.