सदर पुरस्कार क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री श्री राज चौधरी त्याचप्रमाणे बुद्धिबळामधील ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रैंडमास्टर मा. अभिजीत कुंटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री श्री राज चौधरी त्याचप्रमाणे बुद्धिबळामधील ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रैंडमास्टर मा. अभिजीत कुंटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर प्रसंगी क्रीडा भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष श्री विजय जी पुरंदरे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या उपाध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, बुद्धिबळामधील छत्रपती पुरस्कार विजेते श्री जयंत गोखले, बुद्धिबळ क्षेत्रातील अनेक मान्यवर, क्रीडा भारतीचे कार्यकर्ते आणि क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
सदर प्रसंगी श्री अभिजीत कुंटे यांनी 1981 पासूनच्या सांगली मधील आणि पुण्यामधील श्री शिदोरे यांच्या बाबतचे अनुभव व अन्य माहिती सांगितली. श्री जयंत गोखले व राज चौधरी यांनी श्री शिदोरे यांचे क्रीडा भरती मधील काम व अन्य माहिती दिली.
श्री शिदोरे यांनी त्यांच्या 1981 पासून सांगली मधील श्री भाऊसाहेब पडसलगीकर आणि नूतन बुद्धिबळ मंडळ मध्ये काम करतानाचे अनुभव सांगितले. 1985 मध्ये विश्वनाथ आनंद सांगलीमध्ये बुद्धिबळ स्पर्धा खेळण्यासाठी आलेला होता, त्यावेळी देखील श्री शिदोरे यांनी त्या स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम केल्याचा अनुभव सांगितला. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये आल्यानंतर श्री अभिजीत कुंटे व जयंत गोखले यांच्यापासून प्रेरणा घेऊन पंच परीक्षा दिल्या व त्यानंतर आंतरराष्ट्रीय पंच 2013 मध्ये झाल्या बाबतची माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्रीडा भारतीचे पुणे महानगराचे मंत्री श्री विजय राजपूत यांनी केले व कार्यक्रम संपन्न झाला.
Categories
पुणे