Pradeep Sharma - एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना मोठा दिलासा; आधी जन्मठेपेची शिक्षा आता…

मुंबई ( DailyMarathiNews ): एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा ( Pradeep Sharma ) यांना मुंबई हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने त्यांना सर्वात मोठा दिलासा दिला आहे. प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना कायम जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) - संग्रहीत छायाचित्र


प्रदीप शर्मा ( Pradeep Sharma ) यांना मोठा दिलासा

मुंबई हायकोर्टाच्या या निकालाविरोधात प्रदीप शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर केला आहे.

न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या द्विसदस्य खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांना लखनभैय्या हत्या प्रकरणात सेशन कोर्टानं निर्दोश मुक्तता केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हा निकाल फिरवून प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवलं होतं.

Pradeep Sharma - नेमकं प्रकरण काय?

2006 मध्ये झालेल्या लखन भैय्या एन्काउंटरची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ती चकमक बनावट असल्याचं एसआयटी चौकशीत उघड झालं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसातील 13 अधिकारी आणि पोलिसांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्मांचाही समावेश होता.

लखन भैय्या इन्काऊंटरचं नेतृत्व माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी केले होते. ही एक कथित बनावट चकमक असल्याचा आरोप करत लखन भैयाच्या भावाने याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती

2008 मध्ये त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. शर्मा हे 1983 च्या बॅचचे अधिकारी असून 2020 मध्ये ते निवृत्त होणार होते. परंतु त्याआधीच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून राजकारणात पाऊल ठेवलं होतं. मात्र राजकारणात त्यांना अपयश आलं.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म