एज्युकेशनल रिसोर्स प्रोव्हायडर पुरस्कार - भारतातील शिक्षकेत्तर- कर्मचाऱ्यास प्रदान

 दुबई  येथील शैक्षणिक संस्थेचा शैक्षणिक व संशोधनातील "एज्युकेशनल रिसोर्स प्रोव्हायडर पुरस्कार"  भारतातील शिक्षकेत्तर- कर्मचाऱ्यास प्रदान व  इंडोनेशियातील विद्यापीठाच्या पुरस्कारासाठी निवड.




एस.पी.जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट या दुबई येथील शैक्षणिक संस्थेने   शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याबद्दल पुण्याच्या डॉ. तुषार निकाळजे या  शिक्षकेतर कर्मचाऱ्यास " एज्युकेशनल रिसोर्स प्रोव्हायडर पुरस्कार" प्रदान केला आहे .

हा पुरस्कार  समारंभ  दि. 21 एप्रिल 2025 रोजी दुबई  येथे संपन्न झाला आहे. डॉ. निकाळजे यांनी आजपर्यंत 14 पुस्तके लिहून प्रकाशित केली  आहेत. दोन पुस्तके महाराष्ट्रातील 9  विद्यापीठांच्या व  4  स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता प्राप्त आहेत . दृष्टिहीन व्यक्तींकरिता "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी" हे इंग्रजी- ब्रेल पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे. सामान्य प्रशासन, विद्यापीठ प्रशासन, निवडणूक प्रशासन,  नागरी सेवा  या विषयांवर आजपर्यंत डॉ. निकाळजे यांनी 86 लेख लिहून प्रकाशित केले आहेत. सदर लेख साप्ताहिके, मासिके, विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता प्राप्त रिसर्च जर्नल्स यामध्ये प्रकाशित झाले आहेत. त्याचबरोबर डॉ. निकाळजे यांनी चार माहितीपटांची निर्मिती व लेखन केले आहे. या माहितीपटांमध्ये क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड, रिटायर्ड बट नॉट टायर्ड,  बिहाइंड द व्हाईट कॉलर हे माहितीपट, तसेच 'ओन्ली शी कॅन' या ॲनिमेशन माहितीपटाचा समावेश आहे. डॉ. निकाळजे यांना आजपर्यंत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 17  पुरस्कार मिळाले आहेत. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, तामिळनाडू, लंडन, अमेरिका, थायलंड, मलेशिया इत्यादी ठिकाणच्या शैक्षणिक व संशोधन संस्थांनी डॉ. निकाळजे यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. डॉ. तुषार निकाळजे यांनी हे सर्व शैक्षणिक व संशोधनात्मक कार्य स्वखर्चाने केले आहे. 

डॉ. तुषार निकाळजे


डॉ. निकाळजे 32  वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात  शिक्षकेत्तर - कर्मचारी ( non-  teaching staff) म्हणून कार्यरत होते. ते  मार्च-  2022 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु सेवानिवृत्तीनंतर  आजही शैक्षणिक, संशोधनात्मक, लेख पुस्तक लिखाण, लघु प्रकल्प यामध्ये व्यस्त आहेत. डॉ. निकाळजे यांचा हा प्रवास इतरांनाही प्रेरणादायी ठरणारा  आहे. या सर्व शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन दुबई येथील शैक्षणिक संस्थेने डॉ. तुषार निकाळजे या  शिक्षकेतर कर्मचाऱ्यास पुरस्कार प्रदान केला  आहे.

तसेच द्विजेंद्र विद्यापीठ, बाली, इंडोनेशिया या विद्यापीठाने  पुरस्कारासाठी डॉ. तुषार निकाळजे यांची निवड केली  आहे. इंडोनेशियामध्ये हा पुरस्कार वितरण  समारंभ मे- 2025 मध्ये होणार आहे.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म