Jyoti Malhotra YouTuber - यूट्यूबर ज्योतीवर देशद्रोहाचा गुन्हा! करत होती पाकिस्तानसाठी हेरगिरी

Jyoti Malhotra Arrest - सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेली प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Indian YouTuber Jyoti Malhotra arrested for spying for Pakistan


Jyoti Malhotra YouTuber
Jyoti Malhotra YouTuber


2023 मध्ये ज्योती मल्होत्राने दिली पाकिस्तानला भेट

ज्योती मल्होत्राच्या ( Jyoti Malhotra ) सोशल मीडिया प्रोफाईलनुसार तिचे 1.31 लाख फॉलोअर्स आहेत. 2023 मध्ये तिने पाकिस्तानला भेट दिली होती. पाकिस्तान उच्चायुक्तालयात व्हिसासाठी गेल्यानंतर तिची ओळख एहसान-उर-रहीम उर्फ दानिश या पाकिस्तानी अधिकाऱ्याशी झाली. याच दानिशच्या माध्यमातून ती पाकिस्तानात अली, शाकिर आणि राणा शहबाज या आयएसआय अधिकाऱ्यांशी संपर्कात आली.

तिच्या प्रवासाची आणि वास्तव्याची संपूर्ण व्यवस्था पाकिस्तानकडून करण्यात आली होती. भारतात परतल्यानंतर ती व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामवरून या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहिली.

ज्योती मल्होत्राने ( Jyoti Malhotra ) भारतातील काही संवेदनशील माहिती त्यांना पुरवल्याचं स्वतः कबूल केल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.

हरियाणातील हिसारची रहिवासी असलेल्या या महिलेला पानीपत येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ती पाकिस्तानच्या ISI (Inter-Services Intelligence) या गुप्तचर संस्थेसोबत थेट संपर्कात होती आणि तिने भारतातील गोपनीय माहिती शत्रू देशाला पुरवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

Jyoti Malhotra Arrest | देशद्रोहाखाली गुन्हा दाखल; परराष्ट्र मंत्रालयाची दखल

या प्रकरणाच्या गंभीरतेची दखल घेत भारत सरकारने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशला 13 मे रोजी भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. ज्योती मल्होत्रावर भारतीय न्याय संहिता (BNS) चं कलम 152 आणि ऑफिशियल सीक्रेट्स ॲक्ट 1923 चे कलम 3, 4, 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या आणि परदेशी संपर्क असलेल्या इन्फ्लुएंसर्ससाठी मोठा इशारा ठरू शकते. भारतात विविध माध्यमांतून चालणाऱ्या हेरगिरी नेटवर्कचा भाग बनल्यास कायदेशीर कारवाई टाळता येणार नाही, हे या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म