बारामती पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकले यांची उडी; सुनेत्रा पवारांविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे ‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) पुन्हा एकदा राजकीय रणांगणात उतरले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या (Baramati Assembly Constituency) पोटनिवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. 

अभिजीत बिचुकले
अभिजीत बिचुकले


राज्याच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे बिचुकले यावेळी थेट उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात शड्डू ठोकला

महाराष्ट्राचे दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उमेदवार आहेत. स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकले यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात अपक्ष (Independent) म्हणून शड्डू ठोकला आहे.

यापूर्वी २०२४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीतही बिचुकले यांनी बारामतीतून नशीब आजमावले होते. “या पोटनिवडणुकीसाठी मी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला असून, लवकरच पत्रकार परिषद घेऊन माझी सविस्तर भूमिका मांडणार आहे,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. बिचुकले यांच्या या निर्णयामुळे बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म