गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत मराठी पुस्तकाची झेप...

DailyMarathiNews ( Pune ): "जास्तीत जास्त लेखक एकाच वेळी स्वतःच्या पुस्तकावर स्वाक्षरी" करण्याचा विश्वविक्रम याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. याचे आयोजन ईएसएन पब्लिकेशन, चेन्नई व  गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस, लंडन यांनी भारतामध्ये आयोजित केले आहे. यामध्ये सर्व भाषांच्या पुस्तकांचा समावेश केला आहे. या जागतिक विक्रमामुळे समाविष्ट होणारे लेखकाची  स्वाक्षरी असलेली  पुस्तके  केवळ साहित्यिक राहाणार नाहीत,  तर ते जगातील सर्व वाचकांसाठी एक संस्मरणीय आठवण बनणार आहेत. या विश्वविक्रमामध्ये पुण्यातील लेखक डॉ. तुषार निकाळजे यांच्या "भारतीय निवडणूक प्रणाली, स्थित्यंतरे व आव्हाने"  या मराठी पुस्तकाचा समावेश आहे.  संबंधित संस्थेने याबाबत अनुमती कळविली  आहे.

भारतीय निवडणूक प्रणाली, स्थित्यंतरे व आव्हाने - डॉ. तुषार निकाळजे


याप्रसंगी डॉ. तुषार निकाळजे म्हणाले,  "भारत हा  जगातील यशस्वी लोकशाही  देश म्हणून ओळखला जातो. यामध्ये निवडणूक प्रणालीची महत्त्वाची भूमिका आहे. तसेच भारत हा मागील पंधरा वर्षापासून आशियाई निवडणूक फेडरेशनचा अध्यक्ष आहे. सध्या भारताची आंतरराष्ट्रीय निवडणूक असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या दिशेने वाटचाल चालू आहे, दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी स्वीडन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय निवडणूक चर्चासत्रामध्ये भारतास  अध्यक्षपद दिले गेले होते,  माझे 'भारतीय निवडणूक प्रणाली' हे पुस्तक  यामध्ये खारीचा वाटा ठरू शकेल, तसेच मराठी भाषेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळा ठसा उमटवू  शकेल असे वाटते".

डॉ. तुषार निकाळजे


डॉ. निकाळजे यांचे हे पुस्तक महाराष्ट्रातील 9 विद्यापीठे व 4 स्वायत्त महाविद्यालये  यांच्या बी. ए व एम. ए. राज्यशास्त्र विषयाच्या वेगवेगळ्या चौदा विषयांच्या अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता प्राप्त आहे.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म