‘धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही…’; प्रधानांविरोधात आंदोलनाचा एल्गार!

NEET Protest | नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्ली येथील जंतर-मंतर (Jantar Mantar) परिसरात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. कॉकरोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्याचवेळी संघटनेने आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण ठेवण्याचे आवाहनही केले आहे.

Abhijit Dipke
Abhijit Dipke


राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम :

जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे प्रमुख प्रवक्ते सौरव दास (Sourav Das) यांनी बुधवारी रात्री माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी पदाचा राजीनामा देईपर्यंत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणात सरकारने ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन अनिश्चित काळ सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


 

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म