पुणे ( DailyMarathiNews ): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या अभ्यास मंडळाने नुकतीच जाहीर केलेल्या टी. वाय. बी. ए.(पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ) (लोकप्रशासन) या अभ्यासक्रमाकरीता डॉ. तुषार निकाळजे यांचे "भारतीय निवडणूक प्रणाली- स्थित्यंतरे व आव्हाने" या पुस्तकाची जुलै- २०२६ पासून संदर्भ पुस्तक म्हणून निवड केली आहे.
![]() |
| भारतीय निवडणूक प्रणाली- स्थित्यंतरे व आव्हाने - मुखपृष्ठ |
"सिव्हिल सर्विसेस इन इंडिया" या विषयाकरिता संदर्भ पुस्तक म्हणून समाविष्ट झाले आहे. सदर पुस्तक विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंग (डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम) अंतर्गत एम.ए. (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमाच्या "बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार आणि निवडणूक अभ्यास" या विषयास, तसेच यापूर्वी एम. ए. (राज्यशास्त्र) (Choice Based Credit System) "पॉलिटिकल प्रोसेस इन महाराष्ट्र" विषयाच्या अभ्यासक्रमात संदर्भ पुस्तक म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.
![]() |
| डॉ. तुषार निकाळजे - पुणे |

