Daily Marathi News ( Mumbai ) 18 Jan 2024: देशाच्या विकासासाठी मुंबईचाही कायापालट करण्यात येत असून, याठिकाणी आपण गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथे केले.
![]() | ||||
Maharashtra CM Eknath Shinde |
Mumbai News: महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नावीन्यपूर्ण उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात येतील. देशाच्या विकासासाठी मुंबईचाही कायापालट करण्यात येत असून, याठिकाणी आपण गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Maharashtra CM Eknath Shinde ) यांनी बुधवारी दावोस येथे जगभरातील गुंतवणूकदारांना केले.
स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत काँग्रेस सेंटर सभागृहात नागरी क्षेत्रातील आव्हाने, नावीन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या चर्चासत्रात मुख्यमंत्र्यांनी विचार मांडले. जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगातील अनेक भागांत तंत्रज्ञानाच्या जोरावर नावीन्यता केंद्रे (इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट) पुढे आले आहेत, त्यामुळे त्या परिसरात आर्थिक विकासाला चालना मिळत आहे. नावीन्यपूर्ण उद्योग, व्यवसाय, संशोधन संस्था आणि उद्योजकतेची वाढ ही या केंद्रांची वैशिष्ट्ये आहेत. ज्ञानाचे आदानप्रदान आणि तंत्रज्ञानाचा विकास करणारी परिसंस्था या केंद्रांनी तयार केली असून, महाराष्ट्रातही अशाच स्वरूपाची परिसंस्था घडविण्यावर भर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
News Title: Invest In Maharashtra CM Eknath Shinde Appeal To Entrepreneurs At Economic Conference In Davos
- Daily Marathi News