Kanni Poster Released: 'मन उडू उडू झालंय' मालिकेनंतर हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत हे दोघेही 'कन्नी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच नुकतेच चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित झाला आहे.
![]() |
Kanni Film Poster Released |
Kanni Poster Out
'मन उडू उडू झालंय' मालिकेमध्ये हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत या दोघांनीही प्रमुख भूमिका साकारली होती. आता मालिकेनंतर ही जोडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच समीर जोशी दिग्दर्शित 'कन्नी' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मागच्या वेळी बिग बेनला मिठी मारलेले पोस्टर झळकले होते. या पोस्टरने उत्कंठा वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ( Kanni Marathi Film )
'कन्नी' ८ मार्चपासून सर्व चित्रपटगृहांत! ( Kanni Marathi Film )
नुकतंच हृताने सोशल मीडियावर तिच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर सायकलवर बसलेले दिसत आहे. मात्र यात अजिंक्य राऊत मिसिंग असल्यामुळे हे पोस्टर बघून पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच वाढली असणार. पोस्टरमधील चौघांचेही आनंदी चेहरे त्यांच्यातील घट्ट मैत्री दर्शवत आहेत.
- Daily Marathi News ( www.DailyMarathiNews.in )