पुणे - ( DailyMarathiNews ) | निवडणूक आयोग, दिल्ली यांनी महाराष्ट्र, केरळ, गुजरात यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने निवडणूक विषयाचे पुण्यातील संशोधक डॉ. तुषार निकाळजे ( Dr.Tushar Nikalje ) यांनी महाराष्ट्र, केरळ, गुजरात राज्यांचे निवडणूक आयुक्त व पुणे महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधून निवडणुकीसंदर्भातील काही प्रशासकीय सूचना करण्याची परवानगी व संमती मागितली होती.
गुजरात निवडणूक आयोगाने डॉ. तुषार निकाळजे यांच्याशी त्वरित संपर्क साधून निवडणूक सुधारणा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले.
डॉ. निकाळजे यांनी त्वरित गुजरात निवडणूक आयोगास निवडणूक सुधारणा प्रस्ताव पाठविले आहेत.
"यामुळे मतदानाचा टक्का देखील वाढेल व मतदार, निवडणूक कर्मचारी व अधिकारी, तसेच निवडणूक आयोग यांच्यावरील ताण कमी होण्यास व वेळेची बचत होण्यास मदत होईल. या सुधारणा वापरल्यास मागील 75 वर्षांतील प्रशासकीय सुधारणा स्वीकारणारे गुजरात हे भारतातील पहिले राज्य ठरेल," असे डॉ. निकाळजे यांचे मत आहे.
![]() |
डॉ. तुषार निकाळजे ( Dr.Tushar Nikalje ) |
डॉ. निकाळजे ( Dr. Nikalje ) यांनी याबाबत कोणतेही मानधन अथवा वेतन घेणार नसल्याचे निवडणूक आयोगास कळविले आहे. डॉ. निकाळजे यांच्या संशोधनाचा देशसेवा म्हणून वापर व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
- DailyMarathiNews, Pune