DailyMarathiNews - Pune
नवीन पुस्तकाचे आगमन...
प्रतिनियुक्तीवर काम करणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वर्क लाइफ बैलेंस संबंधी भाष्य करणारे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
डॉ. तुषार निकाळजे या संशोधकाने ई एस एन पब्लिकेशन्स, तामिळनाडू यांचे मार्फत हे पुस्तक प्रकाशित केले आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यावरील उपाय योजना, आवश्यक प्रशासकीय बदल या विषयावर या पुस्तकामध्ये प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. सदरचे पुस्तक संशोधक, पत्रकार, अभ्यासक, निवडणूक प्रशासन, शासन यांना उपयुक्त ठरेल. तसेच भविष्यातील "एक देश एक निवडणुक" या संदर्भात या पुस्तकाचा उपयोग होईल", असे डॉ. निकाळजे यांचे मत आहे.
Categories
पुणे