पुणेकरांनो खबरदारी घ्या! उद्या शहरातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

 Pune Water Cut - June 2025 | पुणेकरांसाठी एक महत्त्वाची सूचना! गुरुवार, १२ जून २०२५ रोजी पुणे शहरातील अनेक भागांतील पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद राहणार आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्र आणि भामा-आसखेड प्रकल्प अंतर्गत देखभाल-दुरुस्ती व नवीन जलवाहिन्या जोडण्याचे महत्त्वाचे काम करण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम आणि पूर्व पुण्यातील अनेक भागांना पाणीपुरवठा होणार नाही. ( Pune Water Cut News )


Pune Water Cut on 12 June: Major Areas to Face Supply Disruption Due to Pipeline Work

कसली कामं होणार आहेत? :

पुणे महानगरपालिकेच्या माहितीनुसार, खालील महत्त्वाची कामं करण्यात येणार आहेत:

– वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील विविध टाक्यांना नवीन जलवाहिन्या जोडल्या जाणार.

– नवीन वॉल्व्ह बसवण्याचं काम.

– भामा-आसखेड योजनेत पाणी वितरणातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी चाचणी.

या सर्व कामांमुळे १२ जून दिवसभर पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. १३ जून रोजी सकाळपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. (Pune water cut)


कोणत्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे? :

कोथरुड, बाणेर, बालेवाडी, वारजे, पाषाण, बावधन, भूगाव रोड, सुस रोड, निम्हणमळा, लम्हाण तांडा, डुक्करखिंड, शास्त्रीनगर, भुसारी कॉलनी, गुरूगणेश नगर, सारथी शिल्प, शांतीबन, परमहंस नगर, धनकुडे वस्ती, सुस, म्हाळुंगे आदी.

बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विजयनगर, दत्तनगर, आंबेडकर नगर, मेडीपॉइंट रोड या भागांमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Pune Water Cut News - June 2025 | भामा-आसखेड प्रकल्प अंतर्गत येणारे भाग:

धानोरी, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, येरवडा, संजय पार्क, लोहगाव, बोराटे वस्ती, शेजवळ पार्क (खराडी).

पुणे महानगरपालिकेने (Pune mahapalika) नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचं आणि त्याचा जपून वापर करण्याचं आवाहन केलं आहे. शुक्रवारी पाणीपुरवठा सुरू झाला तरी तो कमी दाबाने असेल. त्यामुळे १२ व १३ जून या दोन्ही दिवसांसाठी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे.

- DailyMarathiNews - Pune

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म