गेल्या आठवड्यात एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान, प्रसिद्ध गायिका सोफिया उरिस्ताने (Sofia Urista) तिच्या एका पुरूष चाहत्याला स्टेजवर बोलावले आणि त्याला खाली झोपवून त्याच्या चेहऱ्यावर ‘लघुशंका’ केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
famous singer Sofia Urista urinated on the face of a fan in a live concert
मुंबई: गेल्या आठवड्यात एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान, प्रसिद्ध गायिका सोफिया उरिस्ताने (Sofia Urista) तिच्या एका पुरूष चाहत्याला स्टेजवर बोलावले आणि त्याला खाली झोपवून त्याच्या चेहऱ्यावर ‘लघुशंका’ केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
प्रसिद्ध गायिका सोफिया उरिस्ताने (Sofia Urista) लाईव्ह कॉन्सर्टमध्येच चाहत्याच्या चेहऱ्यावर केली लघुशंका |
सोफिया उरिस्ताने (Sofia Urista) मागितली माफी
सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल झाल्यानंतर सोफियाने आता या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असे तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे.
पोस्ट लिहून दिलगिरी व्यक्त करत सोफिया उरिस्ताने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘मी नेहमीच स्टेजवर माझ्या मर्यादेत असते. पण त्या रात्री मी माझी मर्यादा विसरले. मी माझे कुटुंब, माझा बँड आणि माझ्या सर्व चाहत्यांवर मनापासून प्रेम करते. माझा लघुशंकेचा स्टंट योग्य नव्हता, हे मला मान्य आहे. मी याबद्दल माफी मागते, माझा हेतू लोकांना दुखवायचा नव्हता.’
बँडनेही मागितली माफी - म्हणालेत सोफिया उरिस्ता खूप उत्साहित झाली होती...
सदरच्या दुर्दैवी घटनेनंतर तिच्या ‘ब्रास अगेन्स्ट’ या बँडनेही सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे. बँडने त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘सोफिया उरिस्ता खूप उत्साहित झाली होती. हे असं काही घडेल याची आम्हालाही अपेक्षा नव्हती. तरीही आम्ही तुम्हा सर्वाना याची खात्री देऊ शकतो की, आमच्या शोमध्ये हे असे प्रकार पुन्हा दिसणार नाहीत. ही संपूर्ण घटना अनपेक्षित होती.’
स्टेजवर लघवी करणारी ती पहिली परदेशी गायिका नाही
आम्ही तुम्हाला सांगतो की, सोफिया उरिस्ता स्टेजवर लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान लघवी करणारी पहिली परदेशी गायिका नाही. याआधीही अनेक परदेशी पॉप गायकांनी असे कृत्य केले आहे. 'नो रेन' फेम गायिका शॅनन हून यांना 1993 मध्ये स्टेजसमोर उभ्या असलेल्या लोकांवर लघवी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.
याशिवाय शानिया ट्वेन, मेरी ओसमंड यांसारख्या गायकांनीही अशी कृत्ये केली आहेत.